वाक येथील गिरणा पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे एक जेसीबी,दोन डंपर जप्त

भडगाव-प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील वाक येथे गिरणा नदी पात्रातून जे.सी.बी.द्वारे उत्खनन करून डंपर द्वारे सर्रास अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. या बाबत दि.२३ रोजी रात्री महसूल व पोलिस पथकाने कारवाई करत एक जे.सी.बी. एक दहा टायर डंपर व एक सोळा टायर डंपर जप्त करण्यात आले असून तीनही वाहने भडगाव तहसील आवारात जमा करण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वाक येथे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे अनेक तक्रारी ह्या गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी केल्या होत्या. तसेच काल रात्री गुप्त माहितीच्या आधारे काल महसूल व पोलिस विभागाने गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणारे एक जेसीबी व दोन डंपर याच्यावर कारवाई केली. हि कारवाई तहसीलदार शितल सोलाट, पोलीस उपनिरिक्षक सुशील सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी समाधान हुल्लुळे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे, विवेक महाजन, गितेश महाजन,योगेश पाटील,एम.जे. खाटिक, प्रमोद पाटील, महसूल सहाय्यक महादू कोळी, महसूल सेवक अमोल पाटील, विशाल पाटील व पोलिस व होमगार्ड पथक हजर होते. सदर कारवाई बद्द्ल सर्वत्र कौतुक होत असून अशाच कारवाई महसूल व पोलिस विभागाने तालुक्यात चालणारी अवैध वाळू वाहतुकीवर करावी. व अवैध वाळू वाहतूकीवर चाप बसवा अशी मागणी होत आहे.






