बग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप
जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा प्रचार दौऱ्याचा धडाका सुरु असून, त्यांचा प्रचार दौरा ज्या भागात असतो त्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादासह प्रचार रॅलीत सहभागही आता जाणवू लागला आहे. जयश्री महाजन यांच्या प्रचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रचारातील नावीन्य. या नावीन्याचीच जळगावकरांना अधिक अपूर्वाई वाटत आहे.
जळगावकरांचे प्रश्न होर्डिंगच्या माध्यमातून मांडणे असो की प्रचार फेरी सुरु असतांना, समोर आलेला एखादा लहानगा असो. प्रत्येकाशी जयश्री महाजन या संवाद साधत आहेत. त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावरून त्यांची जळगावकरांशी असलेली जवळीक व संवाद साधण्याची हातोटी अधोरेखित होत आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून काढण्यात आलेली प्रचार फेरीत समर्थकांनी जयश्री महाजन यांचा प्रचार सुरु होण्याप्रसंगी बग्गी आणून त्यातून संपूर्ण प्रभागात जयश्री महाजन यांची प्रचार फेरी पूर्ण केली. या बग्गीतून प्रचार करण्याच्या नावीन्याचेही जळगावकरांना अपूर्वाई वाटली.
या सर्वातून नावीन्यपूर्ण विचार मांडण्याच्या जयश्री महाजन यांच्या कौशल्याचे जळगावकर कौतुक करत असून, त्यांच्या प्रचार दौऱ्याला आता जळगावकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.