भडगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

भडगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
भडगाव-प्रतिनिधी राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव तालुक्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शासकीय विश्रामगृह भडगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष समाजभूषण भानुदास विसावे होते.प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे,धनराज पवार उत्तम मोरे,डॉ.समाधान वाघ, मधुकर वाघ,सागर वाघ, नितिन तायडे, संजय शेवाळे, दगडू गायकवाड,गणेश अहिरे,नीळकंठ बावीस्कर, तुकाराम बावीस्कर, शांताराम बोरसे,आनंदा अहिरे,मोहित अहिरे, हेमंत अहिरे,डॉ. साहेबराव अहिरे,माजी नगरसेविका योजनाताई पाटील, संगिता रवींद्र अहिरे, कविता वाघ,हिरामण पाटोळे,प्रदीप वाघ, वसंत वाघ, विलास मोरे,सुनिल मोरे,शिवाजी बाविस्कर, मुकेश मोरे,कैलास देवरे,भडगाव तालुका अध्यक्ष रवी अहिरे,सुधिर अहिरे आदींसह तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी समाजातील ७५ दहावी, बारावी, पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन सर यांनी तर आभाप्रदर्शन तालुकाध्यक्ष रवी अहिरे यांनी मानले