
स्व.बापुजी युवा फाउंडेशन आयोजीत भडगावात रंगला क्रिकेटचा महाकुंभ
आमदर चषक विजयी मानचिन्ह के.सी.सी संघाने पटकाविले
भडगाव – प्रतिनिधी
भडगाव शहरासह तालुक्यातील क्रिकेट प्रेमींची सर्वात मोठी व स्व.बापुजी युवा फाउंडेशन आयोजित आमदार चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा दि. २० ते २३ फेब्रुवारी २०२५ यादरम्यान भडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंड वर पार पडली. आमदार चषकात भडगावात पहिल्यांदाच खेळाडूंचे ऑक्शन घेऊन you tube live च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. स्पर्धेत भडगाव तालुक्यातील १९७ खेळाडूंनी नोंदणी केली होती .स्पर्धेत ८ संघांनी सहभाग नोंदविला होता .स्पर्धेचे प्रथम बक्षीस ५१ हजार होते व आमदार चषक विजयी मानचिन्ह के.सी.सी संघाने पटकाविले तर द्वितीय बक्षीस ३१ हजार छाया हॉस्पिटल संघाने पटकाविले. सदर स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भडगाव- पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील तसेच प्रियंकाताई पाटील उपस्थित होते .पारितोषिक वितरण समारंभ हा स्व. बापूजी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लखिचंद पाटील, राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, युवराज पाटील, दिनेश तांदळे सर, रावसाहेब पाटील महेंद्र ततार निलेश पाटील, पत्रकार संजय पवार, पत्रकार सागर महाजन, सुधाकर पाटील, सुपडू खेडकर,अशोक परदेशी, सोनू शेख, प्रवीण महाजन सर, असीम मिर्झा, पिंटू मराठे, आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी,माजी खेळाडू पोलीस अधिकारी क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेचे यशस्वी आयोजन करिता आयोजक समितीत स्वप्नील परदेशी, किशोर पाटील, जगदीश सोनवणे, विनोद महाजन, अनिरुद्ध ठाकरे , चेतन खैरनार , हरीश परदेशी, रवींद्र वाडेकर व इतर सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले