वैद्य प्राजक्ताताई महाले यांना पहिला सुशील महिला उद्योजकता पुरस्कार

वैद्य प्राजक्ताताई महाले यांना पहिला सुशील महिला उद्योजकता पुरस्कार
चोपडा प्रतिनिधी I भगिनी मंडळ, चोपडा यांच्या वतीने स्व. डॉ. सुशीलाबेन शाह (जीजी) यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त “संस्कृती रक्षती स्त्रीशक्ती” या ब्रीदवाक्याखाली आयोजित कार्यक्रमात सुशील महिला उद्योजकता पुरस्कार यंदा प्रथमच प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या पहिल्या वर्षी आहारतज्ज्ञ आणि उमलत्या कळ्यांच्या मार्गदर्शक प्राजक्ताताई महाले यांची पुरस्कारार्थी म्हणून निवड झाली.
हा पुरस्कार स्व. डॉ. सुशीलाबेन शाह यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सुशील शिक्षक पुरस्कार आणि सुशील महिला उद्योजकता पुरस्कार वितरण सोहळ्यात बिज भाषण वक्त्या डॉ. प्रीती विश्वेश अग्रवाल (संचालक, जी. एच. रायसोनी कॉलेज, जळगाव) यांच्या हस्ते महाले यांना प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे चंद्रकांत गोसालिया (माजी आमदार, मुंबई), डॉ. विकास हरताळकर, चंद्रहासभाई गुजराथी, सोहळ्याचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, छायाताई गुजराथी, भगिनी मंडळाच्या संस्थाध्यक्षा पूनम बेन गुजराथी, लक्ष्मी महिला पतपेढीच्या अध्यक्षा अश्विनी गुजराथी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.






