
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील श्री कालभैरव मंदिर, रथ चौक येथे उद्या बुधवार, दि.१२ रोजी श्री कालभैरव जयंतीनिमित्त भैरवचंडी यज्ञ, हितगुज व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आशिर्वाद व प्रमुख अतिथी म्हणून प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
मंदिरात उद्या सकाळी ८ ते ११ या वेळात भैरवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ ते १२ या वेळेत प.पू. गुरुमाऊली यांचे हितगुज होणार आहे. कार्यक्रमानिमित्त आलेल्या भाविकांसाठी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वाजता जागरण गोंधळ या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सेवा व आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, प्रणीत जळगाव शहर यांनी केले आहे. मुख्य आयोजन लोकमान्य टिळक बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वांनी उपस्थित राहून श्री कालभैरव जयंतीचा आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






