भडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न

भडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न
भडगाव- प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.२५ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक ४ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराज टाउन हॉल भडगाव येथे संपन्न झाले.
या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी तहसीलदार श्रीमती शितल सोलाट,भडगाव नगरपरिषद उपमुख्याधिकारी पंकज सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, कृषी अधिकारी दीपक ठाकूर, तालुका कृषी अधिकारी,सहाय्यक गट विकास अधिकारी सुशील सोनवणे, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ : पुरवठा शाखा –१३२ नवीन/दुबार शिधापत्रिका,सं.गा.यो.शाखा – ३२७ लाभार्थ्यांची डी.बी टी.प्रक्रिया पूर्ण, ९९ हयात प्रमाणपत्रे,१२ नवीन अर्ज,
सेतु शाखा – २९८ उत्पन्न, १०२ राष्ट्रीयत्व,१७२ रहिवासी,११८ जातीचे दाखले वाटप,२१ आधार नोंदणी, ५५ यासुधारणा,पंचायत समिती – २जलतारा योजनेला प्रशासकीय मान्यता,बालविकास विभाग – १० लाभार्थ्यांना बेबी कीट वाटप,तालुका आरोग्य विभाग- जननी सुरक्षा योजना-१० लाभार्थीना लाभ वाटप,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना-१०लाभार्थीना लाभ वाटप ,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- २लाभार्थ्यांना लाभ,संजय गांधी योजना-२० लाभार्थ्यांना लाभ,कृषी विभाग- फळबाग लागवड योजना- ४ लाभार्थी,गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना- २ लाभार्थी.
शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते. यावेळी एकूण ९००ते ९५०नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली.
शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार श्रीमती शितल सोलाट,यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशांत कुंभारे, अविनाश जंजाळे, मेहमूद खाटिक, महादू कोळी,लोकेश वाघ, किरण मोरे, निखिल बावस्कर, प्रसाद दुदुस्कर, कैलाश भोई, सौ.अनिता सुतार, प्रियंका शिंदे, भाविका पाटील, कल्याणी पाटील, आदी ग्राम महसूल अधिकारी यांच्या सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुणाल कोळी यांनी आभार मानले






