Crime

व्हायरल व्हिडिओनंतर भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई

दोन तरुणांना अटक; दोन अल्पवयीन बालकांवरही कारवाई, चार वाढीव कलमांची भर

व्हायरल व्हिडिओनंतर भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई

दोन तरुणांना अटक; दोन अल्पवयीन बालकांवरही कारवाई, चार वाढीव कलमांची भर

भुसावळ | प्रतिनिधी चार महिन्यांपूर्वी घडलेल्या १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या प्रकरणात भुसावळ पोलिसांनी अखेर कारवाई केली आहे. समाजमाध्यमांवर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेत सिद्धेश महाडीक (१९) आणि सागर साळुंखे (१९) यांना अटक केली आहे. प्रकरणातील दोन अल्पवयीन बालकांवरही बाल न्याय व्यवस्थेनुसार कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी २३ एप्रिल रोजी घटना घडली होती. त्यानंतर २४ एप्रिल रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रकरणातील संशयितांवर कारवाई होत नसल्याने पीडित तरुणाच्या आईने १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती.यानंतर व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आला. फिर्यादीच्या आईच्या पुरवणी जबाबासह व्हिडिओतील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मूळ गुन्ह्यात BNS १४०(१), १२७(२), IT Act ६६(E) आणि ६७ ही चार वाढीव कलमे समाविष्ट केली.

मुख्य संशयित बालक आधीच बाल सुधारगृहात

प्रकरणातील १७ वर्षे ११ महिन्यांच्या मुख्य संशयिताला यापूर्वीच बाल सुधारगृहात हजर करण्यात आले आहे. तर १७ वर्षीय दुसऱ्या बालकाला आज बाल सुधारगृहात पाठवण्यात आले.दरम्यान, दोन्ही अटक आरोपींची पुढील कायदेशीर रिमांड प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button