Social
प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी मनीषा चौधरी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शहरातील निवृत्ती नगर भागात सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेणाऱ्या मनीषा प्रदीप चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच नंदुरबार येथे झालेल्या महासंघाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, नाशिक विभागीय युवक अध्यक्ष प्रशांत सुरळकर, तसेच विनोद चौधरी, सारिका चौधरी, योगिता चौधरी, स्वप्निल चौधरी, धनंजय चौधरी यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
मनीषा चौधरी यांच्या निवडीचे समाजातील विविध स्तरातून स्वागत होत असून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.






