Big Breaking : भुसावळ शहरात डबल मर्डर, दोघांची गोळी झाडून हत्त्या?
महा पोलीस न्यूज | २९ मार्च २०२४ | जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने रक्तरंजीत झाले आहे. भुसावळ – जळगाव जुन्या रस्त्यावर पुलाजवळ दोघांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याचे बोलले जात असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या पुलाजवळ बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना लागलीच खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत. जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मयत एक राजकीय पदाधिकारी तर दुसरा हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते.