धनादेश देण्याच्या मोबदल्यात 40 हजाराची लाच मागणाऱ्या महिला सरपंचासह अन्य तिघांना अटक

धनादेश देण्याच्या मोबदल्यात 40 हजाराची लाच मागणाऱ्या महिला सरपंचासह अन्य तिघांना अटक
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील मेहु येथील सरपंच सह तिघांनी व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी तीन लाखांचा धनादेश देण्याच्या मोबदल्यामध्ये 40 हजाराची लाख स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अटक केल्याची घटना बुधवारी घडले असून याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेमुळ पारोळा तालुक्यात खळबळ उडाली आहे,
सरपंच जिजाबाई गणेश पाटील (वय ४३) त्यांचे पती गणेश सुपडू पाटील (वय ५५) व मुलगा शुभम गणेश पाटील (देवरे) (वय २६, सर्व रा. मेहू, ता. पारोळा) याच्यासह खासगी सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील (वय ३५, रा. बोदडे, ता. पारोळा) अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहे,.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सन २०१७-१८ ते २०२२- २३ दरम्यान, पारोळा तालुक्यातील मेहू गावाचे सरपंच होते. त्यांनी गावात व्यायाम शाळा बांधण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत सात लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यानंतर व्यायाम शाळा बांधण्याचे कंत्राट कंपनीला दिले होते. त्यानंतर सन २०२३ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून जिजाबाई गणेश पाटील यांची निवड झाली होती. तत्कालीन सरपंचांनी सात लाख रुपयांपैकी चार लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला होता. उर्वरित तीन लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी कंत्राटदाराकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोकों राकेश दुसाने आणि पोकों अमोल सुर्यवंशी या पथकाने सापळा रचून सरपंच निजाचाई गणेश पाटील, तिया पती गणेश सुपडू पाटील, मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील यांना लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.