Detection

ब्रेकिंग : घरातच सुरू केला अवैध गॅस पंप.. हॉल, किचन, शौचालयातून ३४ सिलेंडर जप्त

जळगाव एमआयडीसी पोलिसांचा छापा, नवीन निरीक्षकांचा दणका

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उध्वस्त करीत पोलिसांनी ३४ व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.

जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ महामार्गलगत एका अवैध गॅस भरणा केंद्रावर वाहनात गॅस भरणा करताना स्फोट झाला होता. घटनेत ७ नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर शहरातील सर्वच अवैध गॅस भरणा केंद्र बंद होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली करून संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरचा वापर
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे ३.३० वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचून छापा टाकला असता शोएब शेख शफी वय-२०, रा.फातेमा नगर याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, नितीन ठाकूर, रतन गिते अशांनी केली आहे. घटनास्थळी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.

पुरवठा विभागामुळे पोलीस दोन तास ताटकळत
अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांनी ३.३० वाजेच्या सुमारास कारवाई केल्यानंतर महसूल विभागाला कळविले. पुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होत नसल्याने त्यात बराच वेळ गेला. संपर्क झाल्यावर देखील अधिकाऱ्यांची वाट पाहत पोलिसांचा २ तासपेक्षा अधिक वेळ गेला. अंधार पडल्यावर उशिराने अधिकारी दाखल झाल्यावर पुढील कारवाई पार पडली मात्र यात पोलीस दोन तास ताटकळत उभे होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button