ब्रेकींग : जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांची बदली, वाचा नावे..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अद्याप थांबले नसून नाशिक परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले आहेत. या चार निरीक्षकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या गेल्या महिन्यात पार पडल्या होत्या तसेच विनंती बदल्या देखील करण्यात आल्या होत्या. दरम्यान, पोलीस निरीक्षकांनी केलेल्या विनंतीचा सांगोपांग विचार करून विशेष बाब म्हणून काही निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे यांनी काढले आहेत.
त्यामध्ये नाशिक ग्रामीण येथील हेमंतकुमार भामरे यांना नाशिक ग्रामीण विभागाला कायम ठेवण्यात आले आहे. जळगाव येथील प्रदीप देशमुख यांची नाशिक ग्रामीण विभागात , चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांची नाशिक ग्रामीण विभाग व नंदुरबार येथील हेमंतकुमार पाटील यांना नंदुरबार येथे कायम ठेवण्यात आलेले आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने पुढे जिल्ह्यात कोण नवीन अधिकारी येणार याची उत्सुकता लागून आहे.