चाळीसगाव येथील अवैध गौण खनिजच्या जप्त केलेल्या वाहनांची लिलावाव्दारे विक्री
चाळीसगाव :- तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन जप्त करुन चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन व मेहुणबारे पो.स्टे. येथे लावण्यात आलेले आहेत. अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केल्याप्रकरणी या वाहनाबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु संबंधित वाहन मालक यांनी दंडात्मक रकमेचा भरणा न केल्यामुळे जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
अटकावुन ठेवलेल्या वाहनांचे जळगाव येथील उप प्रादेशिक परीवहन अधिकारी यांच्याकडून मुल्यांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन येथे 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता, चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन येथे 27 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता आणि मेहुणबारे पोलिस स्टेशन येथे 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जप्त केलेल्या वाहनांना जाहीर लिलावाव्दारे विकण्यात येणार आहेत.
या लिलावात ट्रॅक्टर, बोलेरो, टेम्पो, ओमिनी, या वाहनांचा सामावेश आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी वाहने प्रत्यक्ष बघुन घ्यावी. या वाहनांच्या दर्शनी भागावर लिलावातील वाहन असे नमुद करण्यात आलेले आहे. तसेच या लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती या करिता चाळीसगाव येथील तहसिल कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लिलावात भागा घ्यावा अशी विनंती चाळीसगावचे तहसिलदार प्र. र पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.