Crime

चाळीसगावात ६ लाख ५७ हजार रुपयांचा गुटखा पकडला ; पाच तस्करांना अटक

अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांची मोठी कारवाई

चाळीसगावात ६ लाख ५७ हजार रुपयांचा गुटखा पकडला ; पाच तस्करांना अटक

अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांची मोठी कारवाई

चाळीसगाव : शहरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक व साठा करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली असून, या कारवाईत ६ लाख ५७ हजार ८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तसेच या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ९ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री हनुमानवाडी, आनंदवाडी आणि बसस्थानक परिसरात एकाच वेळी धडक छापेमारी करण्यात आली.

या कारवाई दरम्यान विमल पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, पान पराग, आरएमडी, रजनीगंधा, राजश्री, राजनिवास, मिराज, केर कोकिल, तुळशी-००, रॉयल जाफरानी जर्दा, एम सुगंधी तंबाखू, बाबा, शॉट, केपी डबल ब्लॅक, झेडएन-०१ जाफरानी जर्दा यासह विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आणि माल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एमएच-१८ डब्ल्यू-८९७७ क्रमांकाची टाटा इंडिका कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजित चांदुमल रावलानी (वय ४३), कुबेर शेखर कदम (वय २७), हितेश किशोर पवार (वय २१), निखिल राजेंद्र केसरवाणी (वय ३१) आणि सौरभ संजय शिनकर (वय २७) यांना अटक केली आहे.

सार्वजनिक आरोग्यास अपायकारक असलेल्या प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि पोलीस निरीक्षक अमितकुमार मने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button