Crime

सावळदे पुलावरून पती-पत्नीची तापीत उडी; दोघांचा मृत्यू

पाडळसरेच्या दांपत्याची दुर्दैवी अखेर; नरडाणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

महा पोलीस न्यूज । शिंदखेडा/अमळनेर, प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातून वाहणाऱ्या तापी नदीवरील सावळदे पुलावरून उडी घेत पती-पत्नीने जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.८ ऑक्टोबर) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी श्याम हरी पाटील (वय ३५) आणि त्यांची पत्नी सपना श्याम पाटील ऊर्फ नासिमा खातून (वय १९) यांचा समावेश आहे. या घटनेने अमळनेर व सिंदखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम पाटील हे काही काळापूर्वी कामानिमित्त एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गेले होते. तेथे ते शेती तसेच ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत होते. याच काळात त्यांची सपना यांच्याशी ओळख झाली आणि पुढे दोघांनी विवाह केला होता.

८ ऑक्टोबर रोजी दुपारी हे दांपत्य मोटारसायकलने सिंदखेडा तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावर आले. घटनास्थळी दोघांची मोटारसायकल उभी करून त्यांनी एकमेकांना ओढणीने व पायात साखळी बांधून नदीच्या खोल पात्रात उडी घेतली.

घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या व मच्छिमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवून पोलिसांनी दोन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले. मृताचे नातेवाईक पंढरीनाथ निंबा पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून नरडाणा पोलिसांनी प्राथमिक टप्प्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आव्हाळे पुढील चौकशी करत आहेत.

दोघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत नरडाणा पोलिसांकडून चौकशी सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आव्हाळे पुढील तपास करीत आहेत.

सावळदे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

सावळदे पुलावर यापूर्वीही आत्महत्येच्या घटना घडल्याने पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुलावर संरक्षक जाळ्या, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन मदत क्रमांकांचे फलक तसेच नियमित पोलिस गस्त सुरू करण्याची मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी अद्याप कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पुलावर तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button