महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
गोजोरे येथे आयोजन : शंभरावर रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
भुसावळ प्रतिनिधी : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयातर्फे भुसावळ तालुक्यातील गोजोरे, ता.भुसावळ येथे रविवार, 7 सप्टेंबर रोजी आयोजित मोफत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शंभरावर रुग्णांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
यांची प्रमुख उपस्थिती
या शिबिरासाठी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, डॉ.मिलिंद पाटील (जळगाव), नाशिक येथील डॉ.प्रमोद महाजन, महेंद्र पाटील सर (जळगाव), उद्योजक सुहास वारके (पुणे),
विभाग संघटक विनीत हंबर्डीकर (पाटील), तालुकाप्रमुख मंगेश पाटील, गाव प्रमुख हर्षल तळेले, नितीन राणे, अनंत भंगाळे, रामू पाटील, सुनील वारके, पांडुरंग जावळे आदींची उपस्थिती होती.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात प्रसंगी नागरिकांचा रक्तदाब तपासण्यात आला तसेच रक्ताची चाचणी करण्यात आली व ईसीजी काढून आरोग्याविषयी जागरूकता करीत संतुलीत आहाराबाबत डॉक्टरांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात डॉ.आफताब खान, डॉ.तेहनीयत अंजुम मो.जफर, डॉ.ईरम शेख जावेद, नर्सिंग स्टाफ गुनगुन कौशल व हसन खान आदींनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी रुग्णालयाचे अॅडमिन प्रमुख ईसरार अहमद व पीआरओ गणेश वाघ उपस्थित होते.






