चोरवड नाक्यावर नाकाबंदी दरम्यान 22 लाख रुपयांचा गुटखा पकडला
रावेर-राज्यात प्रतिबंधित असलेला 22 लाख रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला आणि गुटखा मध्य प्रदेशातून येणाऱ्या चार चाकी वाहनातून नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी पकडला असून वाहनासह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की चोरवड नाका येथील नाकाबंदी दरम्यान मध्यरात्री दीड वाजता सुमारास एका महिंद्रा बोलेरो या चार चाकी वाहनातून संशयित रिजवान शेख रऊफ वय 28 व त्याच्या सोबत असणारा शेख शोएब शेख शरीफ व 27 दोन्ही रा. छत्री चौक पठाणवाडी फैजपूर ता. यावल हे महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला विमल गुटख्याचा साठा घेऊन जात असताना आढळून आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी अरुण नावाच्या व्यक्तीकडून हा गुटख्याचा माल घेतला असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी 22 लाख 160 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. दोघांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनी अंकुश जाधव करीत आहे.