Crime

विविध जिल्ह्यांमधून दुचाकी चोरणारा भामटा जेरबंद ! ; 10 दुचाकी हस्तगत

जळगाव ,नंदुरबार, मालेगाव येथील तीन गुन्ह्यांची उकल ; धुळे तालुका पोलिसांची कारवाई

धुळे I प्रतिनिधी I महापोलीस न्यूज :- जळगाव ,धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला धुळे तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चार लाख दहा हजार रुपयांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. तसेच जळगाव नंदुरबार आणि मालेगाव येथील दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी माहिती दिलेली अशी की, धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका तीस हजार रुपये किमतीच्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी प्रदीप मधुकर सैंदाणे वय 35 रा. महिंदळे ता. जि. धुळे याने ही दुचाकी चोरली असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून हस्तगत करण्यात करण्यात आले असून त्याच्याकडून आणखी नऊ दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहे. यात नंदुरबार शहर पोलीस स्टेशन, जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, आणि मालेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यातील तीन दुचाकी चोरीची त्याने कबुली दिली. आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या इतर दुचाकी त्याने कुठून चोरल्या व त्याचे साथीदार कोण याचा पोलीस तपास करीत आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, किशोर खैरनार, मनोज बाविस्कर, सखाराम खांडेकर, कुणाल शिंगणे, राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, राहुल देवरे, महेंद्र गिरासे आदींच्या पथकाने केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button