Politics

करण पाटलांच्या प्रचारार्थ माजी महापौर मैदानात!

जळगाव शहर प्रभाग १ पासून केली सुरुवात

महा पोलीस न्यूज | २८ एप्रिल २०२४ | जळगाव लोकसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार करण पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली असून जळगाव शहरात देखील त्यांनी प्रचार सुरू केला आहे. जळगावात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि जळगाव शहर महानगरपालिकेच्या माजी महापौर जयश्री महाजन या प्रचारार्थ मैदानात उतरल्या आहेत. रविवारी सकाळी प्रभाग १ मध्ये प्रचार नारळ फोडत प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील (पवार) यांनी आज सर्वात मोठा भाग असलेल्या जळगाव शहरातून प्रचाराला सुरुवात केली. मनपा प्रभाग १ मध्ये प्रचार दौऱ्यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, कष्टकरी, युवक, माता भगिनी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी/कार्यकर्ते सर्वांनी मिळून जळगाव लोकसभा मतदारसंघात मशाल पेटवण्याचा निर्धार करून करण पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळवून देण्याचा निर्धार केला. प्रचारात करण पाटील यांनी परिसराला भेट देतेवेळी जळगाव शहरातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सर्वांना आश्वासित केले.

रविवारी सकाळी ८ वाजता करण पाटील यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत दुध फेडरेशन परिसर राजमालती नगरमधील साईबाबा मंदिरात प्रचार नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. प्रचार रॅली भारतनगर, चित्रसिंग गल्ली, सुरेश कलेक्शन, पोकळे वकीलांचे घराजवळून, दांडेकर मामा निवास परिसर, खडके चाळ, निम्स हॉस्पिटल, गेंदालाल मील, भोंग्याची गल्ली, अमीनमामू यांचे निवासस्थान परिसर, डॉ.सुनिल पाटील दवाखाना परिसर, पांचाळ निवासस्थान परिसर, तक्षशिला बौध्द विहार, शिंदीमामा दुकान परिसर, लक्ष्मीनगर, मधुर कर्मचारी निवासस्थान परिसर, जैन मंदिर परिसर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी प्रचार समाप्ती करण्यात आली.

यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, विष्णू भंगाळे, सरीता नेरकर, डॉ.अस्मिता पाटील, ईबा पटेल, सागर सपके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, वाल्मीक पाटील, राजू पटेल, आम आदमी पक्षाचे अमृता नेतकर आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button