गुप्ताजी ‘ऑन ड्युटी ‘ : तालुका पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांविरुध्द तक्रार!

महा पोलीस न्यूज | ३ मार्च २०२४ | जळगाव शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तालुका पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांची तक्रार केली आहे. प्राप्त तक्रारीनुसार जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अभिषेक पाटील, राम इंगळे व भुषण सपकाळे यांची हफ्ते वसुली बऱ्याच महिन्यापासून सुरू असल्याचे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांना प्राप्त तक्रारीनुसार, दिपकुमार गुप्ताजी आपणास विनंती करतो. मी माझे स्वताचे नाव आपणासमोर उघड करू शकत नाही याबाबत क्षमा असावी. आपण समाजाप्रती करीत असलेल्या कामाची वाहवा आम्ही पेपरमधुन वाचत असतो. खरच आपले काम समाजासाठी प्रोत्साहन देणारे आहे. आपण मागे काही महिन्यापुर्वी केलेल्या तक्रारीमुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीसावर कारवाई झाली होती. आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे. आम्हास आपला समाजाप्रती अभिमान आहे. आता पुन्हा जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अभिषेक पाटील, राम इंगळे व भुषण सपकाळे यांची हफ्ते वसुली बऱ्याच महिन्या पासुन चालु आहे.
पोलीस कर्मचारी यांचे अशा हफ्ता वसुलीमुळे वाळु वाहतुक करणारे माफीया यांची हिम्मत वाढून ते आपल्या सारख्या सर्व सामान्य नागरीक व सरकारी नोकर यांचेवर हल्ला देखील करणेस घाबरत नाहीत. काही दिवसापुर्वी नशिराबाद रोडवर जिल्हाधिकारी साहेब यांचेवर जिवघेणा हल्ला वाळु माफीया यांनी केला होता. त्याचप्रमाणे वाळु माफीया यांनी येणारे काळात आपल्यावर सुध्दा जिवघेणा हल्लाचा घाट घातला आहे असे आम्हास खात्रीशीर बातमीदार यांचेकडुन समजुन आलेले आहे. आपण त्यांचेपासुन सांभाळुन राहावे. आपल्यासारख्या समाजसेवा करणारे माणसांची समाजासाठी खुप गरज आहे.
गिरणा नदीचे पात्र हे जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत आहे. दापोरापासुन ते कानळदा व नांद्रा असे गावात असलेल्या १० ते १२ नदीपाथांवर सर्व वाळुमाफीया हे रात्रंदिवस वाळु भरून वाहतुक करीत असतात ह्याच पांथावर बंदी घातल्यास एक वाळुचा कणही कोणी घेवुन जाणार नाही. परंतु वाळु वाहतुकसाठी चालणारे डम्परवाले व ट्रॅक्टरवाले यांचेकडुन जळगाव तालुका पोलीस स्टेशनकडील पोलीस राम इंगळे, अभिषेक पाटील, व भुषण सपकाळे यांचे अवैध हफ्ता वसुली जमा करण्याचे काम चालु आहे. ट्रॅक्टरचे ५००० रूपये व डम्परचे ८००० हजार रूपये असे अवैध वाळुचे हफ्त्ताचे दर ठरलेले आहे व वसुली चालु आहे. अशा पध्दतीने २०० ट्रॅक्टर व १०० डंम्पर एवढ्या वाहनाकडुन दर महिन्याला हप्ता जमा करीत आहे.
आपण स्वता लक्ष घालून समाजाचे भले होईल व निसर्गाचा ऱ्हास होणार नाही यासाठी उचित पावले उचलुन वरील पोलीसांवर व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांचेवर कारवाई करावी ही विनंती आहे. अशा आशयाचे तक्रार पत्र माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांना प्राप्त झाले असून त्यांनी ते जळगाव पोलीस प्रशासनाच्या फेसबूक पेजला टॅग केले आहे तसेच पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना देखील मेल केला आहे.






