रुळावरून पायी चालणाऱ्या दोघांना रेल्वेची धडक; एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर
जळगाव रेल्वे स्टेशन जवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :-नंदुरबार वरून जळगाव येथे रेल्वेने आलेल्या दोन मित्रांना तुलसी एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या दूध फेडरेशन परिसरात घडली ..
या प्रकरणी पोलिसात आकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. ओम विजय वाघेला वय 23 रा. अहमदाबाद असे मृत तरुणाचे नाव असून समर्थ रघुवंशी वय 22 रा. नंदुरबार असे गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बडोदा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे ओम आणि समर्थ हे दोन्ही मित्र जळगावहून काही मित्रांसोबत नाशिकला जाणार होते. हे दोघी नंदुरबार होऊन जळगाव कडे येत असताना त्यांची रेल्वे आऊटर ला काही वेळ थांबली असता बराच वेळ झाला असे समजा दोघांनी पायी चालत जाऊन रेल्वे स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र जळगाव कडून येणाऱ्या तुलसी एक्सप्रेसने दोघांना धडक दिल्याने यात ओम वाघेला हा दूर फेकला जाऊन तो जागीच ठार झाला तर त्याचा मित्र समर्थ रघुवंशी हा गंभीर जखमी झाला. याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,