नंदाने येथील आजी-माजी सरपंचाला एक लाखांची लाच घेताना अटक

नंदाने येथील आजी-माजी सरपंचाला एक लाखांची लाच घेताना अटक
धुळे लाच लूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
धुळे प्रतिनिधी
शेत जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तालुक्यातील नंदाने ग्रामपंचायतच्या आजी माजी सरपंचांना एक लाखाची लाच स्वीकारताना धुळ्याच्या एसीबीच्या पथकाने अटक केली,
रवींद्र निंबा पाटील वय 42 हा विद्यमान सरपंच असून अतुल विठ्ठल शिरसाट हा माजी सरपंच आहे.
नंदाने येथे तक्रारदार यांच्या मालकीची गट नंबर 59/3 येथे शेत जमीन असून या जमिनीवर नायरा कंपनीचा उभारण्याची परवानगी मिळावी यासाठी नायरा एजन्सी लिमिटेड यांनी 1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता, जिल्हाधिकारी कार्यालयाने ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या नावे पेट्रोल पंप उभारणी करिता तक्रारदार यांनी अर्ज ग्रामसेवक शशिकांत पाटील यांना दिले. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता सरपंच रवींद्र पाटील यांनी स्वतःसाठी आणि ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्यासाठी 24 जानेवारी रोजी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र पाच लाखात तडजोड होऊन अडीच लाख रुपये मागण्यात येऊन त्याचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना या आजी-माजी सरपंचांना अटक केली,
ही कारवाई धुळे एसीबी चे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, प्रशांत बागुल यांच्या पथकाने केली…