Crime

उमर्टीतून गावठी पिस्टल आणणाऱ्या तरुणाला अटक ; एक जण फरार

शिरपूर पोलिसांची कारवाई

उमर्टीतून गावठी पिस्टल आणणाऱ्या तरुणाला अटक ; एक जण फरार

शिरपूर पोलिसांची कारवाई

शिरपूर प्रतिनिधी

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मध्यप्रदेशातील उमर्टी येथून शस्त्रासह दोघे येणार असल्याची गोपनीय माहिती कळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर शिरपूरातील तरुणाला अटक करण्यात आली तर एक संशयीत मात्र पसार झाला. सैजाद नबी पिंजारी (23, मदिना मोहल्ला, कुंभारटेक, शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

मध्यप्रदेशातील उमर्टी येथून शस्त्र घेवून दोन संशयीत दुचाकीवर शिरपूरकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग क्रमांकावरील 52 वरील दहिवद फाट्याजवळील हॉटेल गुलमोहरजवळ संशयीत दुचाकीसह येताच त्यांना थांबण्याचा इशारा करण्यात आला मात्र पथकाला पाहताच संशयीत पसार होत असताना त्यांचा पाठलाग केल्यानंतर सैजाद नबी पिंजारी यास अटक करण्यात आली तर गुड्डू नुरोद्दीन चौधरी (मदिना मोहल्ला, शिरपूर) पसार होण्यात यशस्वी झाला.

ही कारवाई गुरुवार, 20 रोजी पावणेदोन वाजेच्या सुमारास करण्यात आली. अटकेतील आरोपीच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, चार हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस व 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी, शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद पवार, संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, भूषण पाटील, सुनील पवार, दिनकर पवार आदींच्या पथकाने केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button