
DL Social Foundation तर्फे ५०० वृक्षांचे वाटप; लागवड व संवर्धनासाठी नागरिकांची शपथ आणि हमीपत्र
“एक रोप आजचे – हिरवे भविष्य उद्याचे!” या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम
अमळनेर : पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्याच्या निर्मितीसाठी DL Social Foundation तर्फे राबविण्यात आलेल्या “वृक्ष वाटप व वृक्षसंवर्धन अभियान” अंतर्गत 500 रोपांचे विविध ठिकाणी नागरिकांना वाटप करण्यात आले. केवळ रोपांचे वाटप न करता प्रत्येक रोपाची लागवड करून त्याचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची शपथही रोपे स्वीकारणाऱ्या नागरिकांना देण्यात आली. तसेच, रोपांची लागवड व देखभाल करण्याबाबत त्यांच्याकडून हमीपत्रेही घेण्यात आली.


वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. अनेकदा रोपे लावली जातात; मात्र योग्य देखभालीअभावी ती जगत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन DL Social Foundation ने रोपवाटपाबरोबरच रोपांच्या लागवडीची आणि पुढील देखभालीची जबाबदारी निश्चित करण्यावर भर दिला. या उपक्रमातून नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी रुजविणे हा उद्देश आहे.
“एक कुटुंब – एक झाड, हिरवे अमळनेर – सुंदर अमळनेर!” या संदेशातून नागरिकांनी पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.
या अभियानासाठी संस्थेचे संचालक डॉ. समाधान मैराळे, संचालिका सौ. भावना मैराळे, प्रकल्प समन्वयक महेंद्र ढमाळ, किरण निकुंभ, महेश संदानशिव तसेच उत्कर्ष भदाणे आदींनी परिश्रम घेतले.
DL Social Foundation तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कुटुंबे आणि विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
DL SOCIAL FOUNDATION
संपर्क : 7796112894
ई-मेल : dlsocialfoundation@gmail.com
अमळनेर, जि. जळगाव







