शामराव नगर येथे सुदर्शन दुर्गोत्सव मित्र मंडळातर्फे हरिश्चंद्रगड येथील केदारेश्वर मंदिराचा देखावा

शामराव नगर येथे सुदर्शन दुर्गोत्सव मित्र मंडळातर्फे हरिश्चंद्रगड येथील केदारेश्वर मंदिराचा देखावा
जळगाव प्रतिनिधी : आशा बाबा नगराजवळील शामराव नगर येथील सुदर्शन दुर्गोत्सव मित्र मंडळातर्फे दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून हरिश्चंद्रगड येथील केदारेश्वर मंदिराचा देखावा मंडळातर्फे सादर करण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे.
केदारेश्वर मंदिर – हरिश्चंद्रगड
हरिश्चंद्रगड किल्ल्यावर असलेले केदारेश्वर मंदिर हे प्राचीन व अतिशय पवित्र स्थळ मानले जाते. हे मंदिर एका विशाल गुहेत आहे. गुहेच्या मध्यभागी पाण्याने वेढलेले एक मोठे शिवलिंग आहे. हे पाणी वर्षभर नेहमीच गार असते. यात्रेकरू किंवा ट्रेकर्स येथे पोहोचल्यावर गुहेतल्या त्या थंडगार पाण्यात उतरून भगवान शंकराचे दर्शन घेतात
केदारेश्वर गुहेतील चार खांब
केदारेश्वर मंदिराच्या गुहेत सुरुवातीला चार दगडी खांब होते. हे खांब फक्त वास्तुकलासाठी नसून त्यांना आध्यात्मिक आणि धार्मिक अर्थ आहे.
1. चार खांबांचे प्रतीकात्मक महत्त्व
प्रत्येक खांब एका युगाचे प्रतीक मानला जातोः
सत्ययुग धर्म, सत्य, व नैतिकतेने भरलेले युग
त्रेतायुग – रामायण काळ, धर्म कमी होतो
द्वापरयुग – महाभारत काळ, अधर्म वाढतो
* कलियुग सध्याचे युग, अधर्म व पाप प्रचंड वाढलेले






