Crime

मोठी बातमी : जळगाव शहरातील सर्वात मोठे दारू दुकान फोडले, लाखोंची महागडी दारू चोरी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात उन्हाळ सुरू होताच चोरट्यांनी चोरीचा धडाका लावला आहे. जळगावात एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ईच्छादेवी चौफुलीजवळ असलेल्या अशोका लिकर गॅलरी दुकानात पहाटेच्या सुमारास डल्ला मारत चोरट्यांनी रोख रकमेसह लाखोंची देशी, विदेशी दारू चोरून नेली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे.

उन्हाळा सुरू होताच चोरट्यांनी आपले काम सुरू केले आहे. मंगळवारी रात्री आणि पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एकाच दिवसात दोन ठिकाणी डल्ला मारला आहे. भुसावळ येथील रहिवासी असलेले अशोकशेठ नागराणी यांचे जळगावात ईच्छादेवी चौफुलीजवळ महामार्गालगत अशोका लिकर गॅलरी नावाने मद्य विक्री दुकान आहे. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला.

१२६ बॉक्स महागडी दारू चोरली
चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातील ७० हजार रुपये रोख रक्कम आणि जवळपास १२६ बॉक्स देशी विदेशी दारू लंपास केली आहे. दारूची एकूण रक्कम अंदाजे १० लाख रुपये आहे. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले असून डिव्हिआर देखील चोरून केला आहे.

पोलीस, फॉरेन्सिक टीमकडून पाहणी
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह जिल्हापेठ आणि एलसीबी पोलिसांनी भेट दिली आहे. फॉरेन्सिक टीमकडून ठसे आणि इतर माहिती गोळा करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. मुख्य रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी मारलेला डल्ला पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे.

पहा व्हिडिओ प्रक्षेपण :

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button