Crime

जळगावात पुन्हा उमेदवारावर गोळीबार, घरावर ३ राऊंड फायर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे अपक्ष उमेदवारावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव शहरात एका उमेदवारावर गोळीबार झाला आहे. एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी ३ राऊंड फायर केले. घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा जमला असून तपास सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगाव चांगलेच चर्चेत आले आहे. काही दिवसापूर्वी प्रचार सुरू असताना बोदवड येथे अपक्ष उमेदवारावर विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पोलिसांनी लागलीच काही हल्लेखोरांना पकडले होते. जळगाव शहरात पुन्हा एका उमेदवाराच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन शेख हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या २ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर ३ राऊंड फायर केले. खिडकीला गोळी लागल्याने त्यांना घडलेला प्रकार समजला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलिसांचा ताफा पोहचला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button