खुला गट पुरुष फुटबॉल निवड चाचणी २५ डिसेंबर रोजी जळगावात
जळगाव प्रतिनिधी ;- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबईच्या मान्यतेने व लातूर जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित आंतर जिल्हा राज्यस्तरीय खुल्या गटातील स्पर्धा ९ ते १२ जानेवारी रोजी लातूर येथील उदगीर येथे होत आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवड चाचणी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता ठेवण्यात आलेली आहे.
जे खेळाडू जळगाव जिल्ह्यातील असतील व त्यांच्याकडे नियमानुसार जिल्ह्याचे रहिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड असेल अशा खेळाडूंनीच मुळ कागदपत्रे व आपल्या किटसह निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष प्रा. डॉ अनिता कोल्हे, संचालक भास्कर पाटील व मनोज सुरवाडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
अधिक माहिती साठी वसीम शेख ९७६५१२०५२९, हिमाली बोरोले ७३८५६६२४०१ व राहील सर ८९९९७३९९०८ यांच्याशी संपर्क साधावा व आपली नावे सी आर एस मध्ये रजिस्टरड करून घ्यावी.