समृध्दी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद

समृध्दी महामार्गाने गांजावी तस्करी करणारी टोळी जेरबंद
नाशिक ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई ; १२१ किलो ४२९ ग्रॅम गांजा जप्त
नाशिक प्रतिनिधि नाशिक ग्रामीण राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अंमली पदार्थ गांजाची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक . बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने समृध्दी महामार्गावर शिवडे, ता. सिन्नर परिसरात सापळा त्खुन गांजावी अवैधरित्या तस्करी करणारे दोन चारचाकी वाहनांवर छापा टाकून सुमारे १२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त करून कारवाई केली आहे.
दिनांक १२/०७/२०२५ रोजी समृध्दी महामार्गाने नागपुर कडून मुंबई बाजुकडे दोन वारचाकी वाहनांमध्ये गांजावी मोठयाप्रमाणावर तस्करी होणार असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना मिळाली होती. बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ०४ पथके तयार करून सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृध्दी महमार्गावर गस्तीवर नेमण्यात आले होते. दरम्यान नागपुर बाजुकडून मुंबईनया दिशेने एक सफेद रंगाची स्विफ्ट व एक चॉकलेटी रंगाची होच्छा अमेझ कार भरधाव वेगाने येतांना दिसली, सदर वाहनांचा पोलीस पथकाने शिताफिने पाठलाग केला असता, त्यापैकी स्विफ्ट कार यु-टर्न मारून नागपुर दिशेने भरधाव वेगात गेली, व अमेड़ा कार ही मुंबईच्या दिशेने पळून गेली. दोन्ही वाहनांचा पोलीस पथकाने पाठलाग करून स्विफ्ट कार ही कोकमठाण टोलनाका परिसरात अडविले. तसेब अमेझ कार मधील बालकाने शिवडे गावचे शिवारात वाहन सोडून, तेथून पलायन केले. सदर दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतलेले इसम व वाहनांची पंचासमक्ष इरडती घेतली असता त्यांचे ताब्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला.
१२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा गांजा (किं.स. २४,२८,५८०/- चा) वाहतुक करण्यासाठी वापलेली एक सफेद रंगाची मारूती स्विफ्ट कार, एक चॉकलेटी रंगाची होण्डा अमेझ कार, ०३ मोबाईल फोन, १५,००० रूपये रोख असा एकुण ३६,२९,५८०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींची नावे:-
१) भारत नारायण बाप वय ३५, रा. आण्णाभाऊ साठे नगर, नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर २) तुषार रमेश काळे, वय २७, रा. ज्ञानेश्वर रोड, नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर३) संदिप कचरू भालेराव, वय ३२, रा. गंगानगर, नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर ४) सुनिल भास्कर अनार्य, रा. शिडी, ता. राहता, जि. अहिल्यानगर (फरार)
यातील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावावा अंमली पदार्थ आपले कब्जात करण्यासाठी बाळगुन त्याची अवैधरित्या वाहतुक करतांना मिळून आले म्हणून त्यांचेविरूध्द सिम्मर पोलीस ठाणेस एन.डी.पी. एस. कायदा कलम ८ (क), २० (३), (१), (क), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ताब्यात असलेले आरोपीना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांची १६/०७/२०२५ पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
सदर गुन्हयातील फरार आरोपी सुनिल भास्कर अमार्थे हा नाशिक शहरातील कुख्यात टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी नाशिक शहरातील अंबड, सालपुर, सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये मोक्का, परफोडी, चोरी, आर्म अॅक्ट, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर स्वरूपाचे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या श्रीरामपुर व शिर्डी परिसरात वास्तव्यास आहे. तसेच त्याचा वरील साथीदार संदिप कचरू भालेराव याचेवर देखील पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्हयात दरोडा व चोरी याप्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे ओडीसा राज्यातून चारचाकी वाहनांमधुन गांजाची तस्करी करत होते, तसेच महाराष्ट्र राज्यात गांजाची विकी कोठे करणार होते याबाबत पोलीस पथक कसोशिने तपास करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, सपोनि जिवन बोरसे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सविन धारणकर, विनोद टिळे, सचिन गवळी, माधव साळे, श्रीकांत गारूंगे, सुधाकर बागुल, नवनाथ वाघमोडे, किशोर खराटे, शरद धात्रक, धनंजय शिलावटे, विश्वनाथ धारबळे, प्रितम लोखंडे, नवनाथ शिरोळे, आबा पिसाळ, योगिता काकड, रविंद्र गवळी यांचे पथकांनी सदस्वी