गीता जयंती निमित्ताने श्रीमद्भागवत गीतेचे सामूहिक पारायण
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचा उपक्रम
जळगाव -गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी च्या निमित्ताने दिनांक ११ डिसेंबर रोजी मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीतर्फे श्रीमद् भगवत गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून सोहम विभागाचे संचालक डॉ देवानंद सोनार यांनी श्रीमद् भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायाचे सामूहिक पारायण करून घेतले. श्रीमद्भागवतगीता आपल्या जीवनामध्ये आजच्या सर्व आधुनिक समस्या सोडविण्यासाठी कशी उपयुक्त आहे या संदर्भात यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. श्रीमद्भगवद्गीता हा योगाचा एक महान ग्रंथ असून या ग्रंथाचं आजच्या दिनी स्मरण तसेच दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आचरण करणे चिंतन, मनन करणे सुद्धा आपल्या स्वस्थ आणि आनंदी जीवनासाठी कसे आवश्यक आहे, यासंबंधीची माहिती यावेळी डॉ. देवानंद सोनार यांनी विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पंकज खाजबागे प्रा. ज्योती वाघ प्रा. श्रद्धा व्यास, प्रा. अनंत महाजन प्रा. सोनल महाजन यांचे आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.