Gold-Silver Rate
Gold-Silver Rate : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी वाढली, चांदीनेही घेतली उंच भरारी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दसरा हा पारंपरिकरित्या सुवर्ण खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जातो. आज दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांनी सोन्या-चांदीच्या खरेदीला प्राधान्य दिले असून बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार आजचे दर खालीलप्रमाणे आहेत. २२ कॅरेट सोने प्रति तोळा ₹१,०७,३५०, २४ कॅरेट सोने प्रति तोळा ₹१,१७,२००, चांदी प्रति किलो ₹१,४७,५०० असे दर आहेत.
गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर वाढत्या मार्गावर आहेत. कालच्या तुलनेत आज किंचित घसरण झाली असली तरी दिवाळी आणि लग्नसराईचे दिवस जवळ आल्याने सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भंगाळे गोल्डमध्ये दसरा-दीपावली निमित्त खास ऑफर्स, शुद्धतेची हमी आणि आकर्षक डिझाईन्समुळे ग्राहकांची गर्दी वाढत असून सुवर्णदालनात खरेदीचा माहोल आहे.






