Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, सोनं स्थिर तर चांदीत घसरण

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी | जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमींसाठी आजचे सोने व चांदीचे ताजे दर जाहीर झाले आहेत. भंगाळे गोल्ड या नामांकित दालनातील सोन्या-चांदीचे भाव जाणून घेऊया. जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्डच्या भव्य दालनात आकर्षक दागिने, खास ऑफर्स आणि शुद्धतेची हमी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,००,४८०, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०९,७०० इतके आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२५,००० इतका असून, कालच्या तुलनेत चांदीत ₹१,००० ची घसरण नोंदवली गेली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत वाढत होते. मात्र, आज बुधवारी सोन्याचा दर स्थिर राहिला असून चांदीच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांमध्येच उत्सुकता निर्माण झाली आहे.
दररोज बदलणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरामुळे बाजारातील चढ-उतार अधिक तीव्र होत असल्याचे जाणवत असून, गुंतवणूकदारांना खरेदी-विक्रीचे निर्णय अधिक विचारपूर्वक घ्यावे लागत आहेत. तरीसुद्धा आकर्षक डिझाईन्स, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासू सेवा यामुळे जळगाव व सावदा येथील भंगाळे गोल्ड हे ग्राहकांचे आवडते ठिकाण ठरले आहे.



