Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, सोन्यात वाढ आणि चांदीत उसळी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी | जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमी व गुंतवणूकदारांसाठी आजचे सोने व चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. जळगाव व सावदा येथील भंगाळे गोल्ड या नामांकित दालनात शुद्ध सोन्याची हमी, आकर्षक दागिने आणि पारदर्शक व्यवहार ग्राहकांना उपलब्ध आहेत.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,००,९४५, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१०,२०० इतके झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२८,५०० इतका झाला असून, कालच्या तुलनेत तब्बल ₹३,५०० ची उसळी नोंदवली गेली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे, मात्र आज चांदीत झालेली झपाट्याने वाढ विशेष लक्षवेधी ठरली आहे. दरातील या चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांमध्ये हालचाल वाढली असून, ग्राहक सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
सोन्या-चांदीच्या दरातील रोजच्या बदलांमुळे गुंतवणुकीचे नियोजन बदलत असले तरी आकर्षक डिझाईन्स, सर्वोत्तम ऑफर्स आणि विश्वासू सेवा यामुळे जळगाव व सावदा येथील भंगाळे गोल्ड हेच सुवर्णप्रेमींसाठी पहिलं पसंतीचं ठिकाण ठरत आहे.





