Gold-Silver Rates : दोन दिवसांत सोने-चांदीचे दर सर्वकालीन उच्चांकावर!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून भंगाळे गोल्ड, जळगाव व सावदा येथील दालनांच्या माहितीनुसार आज दरांनी सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीचा परिणाम आज स्पष्टपणे दिसून आला असून अवघ्या एका दिवसात दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
२२ जानेवारी २०२६ रोजी भंगाळे गोल्ड येथे २२ कॅरेट सोन्याचा दर रुपये १ लाख ३८ हजार ७७४ इतका होता, तो २३ जानेवारी २०२६ रोजी वाढून रुपये १ लाख ४२ हजार ७०० झाला आहे. यामध्ये रुपये ३ हजार ९२६ इतकी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे २४ कॅरेट सोन्याचा दर २२ जानेवारी रोजी रुपये १ लाख ५१ हजार ५०० होता, तो २३ जानेवारी रोजी रुपये १ लाख ५५ हजार ८०० पर्यंत पोहोचला असून रुपये ४ हजार ३०० इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे.
चांदीच्या दरातही मोठी झेप पाहायला मिळाली आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी प्रति किलो चांदीचा दर रुपये ३ लाख ८ हजार होता, तो २३ जानेवारी रोजी वाढून रुपये ३ लाख ३० हजार झाला आहे. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात रुपये २२ हजारांची वाढ झाली आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील या वाढीमुळे गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष या दरांकडे वेधले गेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, वाढती मागणी आणि आर्थिक घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येत असून येत्या काळात दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भंगाळे गोल्ड, जळगाव व सावदा येथे दररोज अद्ययावत सोन्या-चांदीचे दर प्रसिद्ध करण्यात येत आहे. हलके वजनाचे डिझाईन्स, प्रीमियम कलेक्शन आणि पारंपरिक लग्न सेट्सना ग्राहकांची मोठी पसंती दिसत आहे. जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्ड दालनात नवीन कलेक्शन पाहण्यासाठी ग्राहकांचा सतत ओघ कायम आहे.





