सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा झपाट्याने वाढ; दिवाळीपूर्वीचा बाजार तेजीत

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी पुन्हा एकदा दरांनी उच्चांक गाठला असून सुवर्णबाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार आजचे दर
- २२ कॅरेट सोने प्रति तोळा – ₹१,१२,६७०
- २४ कॅरेट सोने प्रति तोळा – ₹१,२३,०००
- चांदी प्रति किलो – ₹१,५५,०००
गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात ₹५०० तर चांदीत ₹१,५०० प्रति किलो इतकी वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या भावात सुमारे ₹४,००० वाढ नोंदवली गेली आहे. सणासुदीची खरेदी आणि गुंतवणुकीचा कल यामुळे बाजार तेजीत राहिला आहे.
दिवाळी, लग्नसराई आणि सणासुदीच्या ऑफर्समुळे भंगाळे गोल्ड मध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. शुद्धतेची हमी, नवे डिझाईन्स आणि आकर्षक स्कीम्समुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर सोने व चांदी खरेदी करत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि डॉलरच्या दरातील घसरण यामुळे सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत दर ₹१,२५,००० च्या आसपास पोहोचतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.




