मोदी सरकारचा आणखी एक निर्णय: फ्लॅटच्या देखभाल खर्चावर १८% जीएसटी!
मध्यमवर्गीयांना महागाईचा दुसरा झटका

मोदी सरकारचा आणखी एक निर्णय: फ्लॅटच्या देखभाल खर्चावर १८% जीएसटी!
मध्यमवर्गीयांना महागाईचा दुसरा झटका
नवी दिल्ली, दि. १३ एप्रिल २०२५: वाढत्या महागाईच्या काळात मध्यमवर्गीयांना केंद्र सरकारने आणखी एक झटका दिला आहे. गृहनिर्माण संस्थांच्या देखभाल खर्चावर आता १८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. यामुळे फ्लॅटमध्ये राहणे आणखी महाग होणार आहे. नुकतीच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाल्यानंतर अवघ्या आठवड्यात हा दुसरा निर्णय जाहीर झाला आहे.
**गृहनिर्माण नियमांत बदल**
मीडिया वृत्तानुसार, सरकारने गृहनिर्माण नियमांत सुधारणा केली आहे. नव्या नियमांनुसार, जर एखाद्या फ्लॅटचा मासिक देखभाल खर्च ७,५०० रुपयांपेक्षा जास्त आणि वार्षिक खर्च २० लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, तर त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.
मात्र, एखाद्या व्यक्तीकडे गृहनिर्माण सोसायटीत दोन किंवा अधिक फ्लॅट असले आणि प्रत्येकी ७,५०० रुपये देखभाल खर्च भरत असल्यास, एकूण रक्कम १५,००० रुपये झाली तरी प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्रपणे जीएसटी लागू होणार नाही. जीएसटी कौन्सिलने २०१८ मध्ये झालेल्या २५व्या बैठकीत गृहनिर्माण संस्थांना दिलासा देण्यासाठी सूट मर्यादा ५,००० वरून ७,५०० रुपये प्रतिमहिना केली होती.
या नव्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.