मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘लेडी सिंघम’ IPS डी. रूपा यांचा प्रेरणादायी प्रवास

मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘लेडी सिंघम’ IPS डी. रूपा यांचा प्रेरणादायी प्रवास
भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचे स्वप्न अनेक तरुणांच्या मनात असते. ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखली जाणारी आयपीएस डी. रूपा या अशा अधिकारी आहेत, ज्यांचं नाव घेताच भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा आणि निर्भय कार्यशैलीमुळे पोलिस दलात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट एका मुख्यमंत्र्यालाही अटक करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते.
कोण आहेत IPS डी. रूपा?
कर्नाटक राज्यातील रहिवासी असलेल्या डी. रूपा यांचे शिक्षण त्यांच्या राज्यातच झाले. त्यांनी कुवेम्पु विद्यापीठातून पदवी घेत सुवर्णपदकही मिळवले. त्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली आणि 2000 साली भारतात 43 वी रँक मिळवत प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. पोलीस प्रशिक्षणातही त्यांनी 5 वी रँक मिळवली.
40 वेळा बदली, पण निडरपणे सेवा
त्यांच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत सुमारे ४० वेळा बदली झाली. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या ईमानदारी, शिस्त आणि निर्भयतेचे दर्शन घडवले. त्यामुळेच त्यांना अनेकदा राजकीय दबाव किंवा धोक्यांनाही सामोरे जावे लागले.
मुख्यमंत्र्यांनाही अटक!
वर्ष 2007 मध्ये डी. रूपा यांनी मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक केली होती. कोर्टाच्या आदेशावरून ही कारवाई केली गेली होती. मुख्यमंत्र्याला अटक करणे हे सोपे काम नव्हते, पण डी. रूपा यांनी कोणताही दबाव न घेता कायद्याचे पालन केले आणि आपल्या जबाबदारीला प्राधान्य दिले.
सोशल मीडियावर सक्रीय, मॉडेलिंगचा छंद
डी. रूपा सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. आपल्या अनुभवांद्वारे त्या अनेक तरुणांना प्रेरणा देतात. त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही पाऊल ठेवले असून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास यामुळे त्या सर्वांच्याच लक्षात राहतात. त्यांची बहीण रोहिणी दिवाकर या आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
IPS डी. रूपा यांनी आजवरच्या सेवेत कधीच तडजोड केली नाही, हीच त्यांची खरी ओळख आहे. आज अनेक तरुण त्यांच्या कार्यशैलीकडे पाहून प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न पाहतात. त्या केवळ एक अधिकारी नसून, धैर्य, प्रामाणिकपणा आणि निष्ठेचं जिवंत उदाहरण आहेत.