सेवा पंधरवडा अभियानांतर्गत हमाल व मापाड्यांना रुमाल वाटप

सेवा पंधरवडा अभियानांतर्गत हमाल व मापाड्यांना रुमाल वाटप
जळगाव (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अभियानाच्या निमित्ताने तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कष्टकरी हमाल व मापाड्यांना रुमाल वाटप करण्यात आले.
या उपक्रमात आमदार सुरेश दामू भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सेवा पंधरवडा अभियान संयोजक विजय वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मनोज चौधरी आणि अशोक राठी यांच्या हस्ते हमाल व मापाड्यांना रुमाल देण्यात आले.
याप्रसंगी मंडल अध्यक्ष विनोद मराठे, माजी मंडल अध्यक्ष सुनील सरोदे, मिलिंद चौधरी, गजानन वंजारी, समाधान धनगर, हमाल संघटनेचे अध्यक्ष कामेश सपकाळे, सहसचिव शरद चौधरी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






