सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन व मुस्लिम बांधवांतर्फे विसर्जन मिरवणुकीचे स्वागत

सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन व मुस्लिम बांधवांतर्फे विसर्जन मिरवणुकीचे स्वागत
जळगाव प्रतिनिधी I दरसालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे भिलपुरा चौकात सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन व मुस्लिम बांधवांतर्फे अत्यंत, उत्साहात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले.
सर्व प्रथम ज. श. म. न. पा. चा मानाचा गणपतीचे भिलपुरा चौकात आगमन झाल्यावर हिंदू बांधव, प्रशासन यांच्या तर्फे पीर लालशाह बाबांच्या दर्ग्यावर चादर व फुले अर्पण करण्यात येऊन दुआ, फातिहा (प्रार्थना ) करण्यात येऊन त्या नंतर आरती करण्यात आली. व त्या नंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे व विसर्जन मिरवणुकीत सामील सर्व गणेश मंडळांचे सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन व मुस्लिम बांधवांतर्फे मंडळांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पुष्पहार घालून व गुलाबाचे फुले देऊन तसेच फुलांच्या पाकळ्यांचा संपूर्ण मंडळावर वर्षाव करून गळाभेट घेऊन मुबारकबाद (शुभेच्छा )देऊन जोरदार स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी जिलाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ज. श. म. न. पा. आयुक्त ज्ञानेश्ववर ढेरे, सै. अयाज अली नियाज अली, तहसीलदार शीतल राजपूत, पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे, राहुल चौधरी, हाजी शकुर बादशाह, रहेमत अली, शेख शफी, शेख जलालुद्दीन, अशफाक नुरी, ओवेश हुसैन, शेख महेबूब, शनी पेठ पो. स्टे. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस पाटील प्रभाकर चौधरी, अकबर इब्राहिम, मनपा चे योगेश बोरोले, मनीष अमृतकर इ. उपस्थित होते.






