Crime

महिला सहाय्यक अभियंत्यासह लाईनमन, तंत्रज्ञ चार हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगाव (प्रतिनिधी );- वीज मीटर मध्ये दोष असल्याने हा दोष सकारात्मक दाखवण्यासाठी तडजोडंती चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महिला सहाय्यक अभियंता सह लाईनमन आणि तंत्रज्ञ यांच्यावर जळगावच्या लास्टलोस्पद प्रतिबंधक विभागाने कारवाई केले असून त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असल्याने त्यांच्या हॉटेलमधील मिटर हे पार्टी असल्याचे कारण देऊन मीटरचा सकारात्मक अहवाल देण्याच्या मागणीसाठी चार हजार रुपयांची लाच तडजोडीअंती स्वीकारणाऱ्या महिला सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुखदेव इंगळे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी या तिघांवर लाच घेताना कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास केली. पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिनेश सिंग पाटील नाईक किशोर महाजन राकेश दुसाने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button