ड्रग्स प्रकरण : जळगावच्या अबरारला मालेगावात एमडी ड्रग्ससह अटक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यासह राज्यभर गाजलेल्या एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या शेख अबरार शेख मुख्तार याला पोलिसांनी मालेगावमध्ये अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ६० ग्रॅम एमडी पावडर जप्त केली असून इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव किल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ वापरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एमडी पावडरची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर विशेष पथकाने छापा टाकला. पोलिसांनी अबरार याच्या ताब्यातून ६० ग्रॅम एमडी पावडर जप्त केली आहे.
२०२३ ते २०२५ पर्यंत, म्हणजेच गेल्या तीन वर्षांत, मालेगावमध्ये १०७ ड्रग्जचे गुन्हे दाखल झाले, ज्यामध्ये २०८ आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आणि अंदाजे ९७ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात २०२५ च्या ९ महिन्यात ६६ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
मालेगाव येथील अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांनी याप्रकरणी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. दरम्यान, मालेगाव येथील पोलीस कोठडी संपल्यानंतर अबरार यास जळगाव पोलीस शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटक करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






