Social

वाढदिवसाचे औचित्य साधत अभेद्या फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पौष्टिक भोजनाचे वाटप

वाढदिवसाचे औचित्य साधत अभेद्या फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पौष्टिक भोजनाचे वाटप

सामाजिक बांधिलकी जपत ॲड. शुभम झाल्टे यांचा स्तुत्य उपक्रम

जळगाव, प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत विधिज्ञ ॲड. शुभम झाल्टे यांच्या वाढदिवसानिमित्त अभेद्या फाउंडेशनच्या शिक्षणघरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पेन आणि पौष्टिक भोजनाचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अभेद्या फाउंडेशन शिक्षणघरच्या संचालिका वैशाली झाल्टे उपस्थित होत्या.

शिक्षण हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. याच भावनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि पौष्टिक भोजन देऊन त्यांच्या शिक्षणप्रवासाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या छोटेखानी उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळण्यासोबतच ‘शिका, पुढे चला आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्या’ हा सकारात्मक संदेशही देण्यात आला. वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button