पोलीस स्पोर्ट्स स्केटिंग अकॅडमी जळगावच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

महा पोलीस न्यूज | २८ मार्च २०२४ | नुकतेच गोवा येथे झालेल्या रोलररिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ४० वी राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पोलीस स्पोर्ट्स स्केटिंग अकॅडमी जळगावच्या दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले असून त्यांची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पोलीस स्पोर्ट्स स्केटिंग अकॅडमी जळगावच्या दोन विद्यार्थिनी लावण्या हर्षल पुराणिक आणि पूर्वेश हर्षल पुराणिक या भाऊ बहिणींनी स्कॉड या स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक पटकाविले असून त्यांची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. देशभरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
दोन्ही स्पर्धेक जळगावात परतले असून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक गृह प्रवीण पवार, पोलीस उपअधीक्षक जळगाव भाग संदीप गावीत, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक वेल्फेअर दीपक बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब गायकवाड, पप्पू देसले व संपूर्ण वेल्फेअर टीम यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयी खेळाडूंना स्केटिंग प्रशिक्षक प्रशिक्षक जागृती काळे, अश्विनी निकम, उज्वला कासार, स्वप्निल निकम यांचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात आणखी उज्ज्वल खेळाडू घडवण्याचा पोलीस स्पोर्ट्स स्केटिंग अकॅडमी जळगावचा मानस आहे.