CrimeSocial

विश्वासाची लेन्स’ स्पर्धेत भूषण हंसकर यांचा दुहेरी बहुमान

‘विश्वासाची लेन्स’ स्पर्धेत भूषण हंसकर यांचा दुहेरी बहुमान

‘गुन्हे विषयक छायाचित्र’ आणि ‘जळगाव वारसा’ या दोन्ही श्रेणींत प्रथम क्रमांक; गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेत भूषण हंसकर यांनी उत्कृष्ट छायाचित्रण कौशल्याच्या जोरावर दुहेरी यश संपादन केले. त्यांनी ‘गुन्हे विषयक छायाचित्र’ आणि ‘जळगाव वारसा’ या दोन्ही श्रेणींत प्रथम क्रमांक पटकावून विशेष बहुमान मिळविला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण विकास) व आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूषण हंसकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वास व समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाने ‘विश्वासाची लेन्स’ हा उपक्रम आयोजित केला होता. या स्पर्धेत हंसकर यांनी टिपलेल्या छायाचित्रांनी परीक्षकांचे तसेच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सत्कार समारंभाला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी भूषण हंसकर यांच्या छायाचित्रण कौशल्याचे कौतुक करून फोटोग्राफी क्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘जळगाव वारसा’ तसेच गुन्हे विषयक छायाचित्रांच्या माध्यमातून विविध विषय समाजासमोर प्रभावीपणे मांडल्याबद्दल हंसकर यांचे अभिनंदन होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button