भडगावात युवा नेतृत्व लखीचंद पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा

भडगावात युवा नेतृत्व लखीचंद पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा
भडगाव -प्रतिनिधीतालुक्यातील दमदार युवा नेतृत्व,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पाचोरा-भडगाव, युवा सेना जिल्हाध्यक्ष जळगाव, स्व. बापूजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,भडगाव नगरपालिका चे माजी नगरसेवक लखीचंद प्रकाश पाटील यांचा दि.२८ गुरुवार रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान भडगाव शहरातील कोठली रोडवर असणारे स्व. बापुजी फाउंडेशन च्या कार्यलयातील प्रागंणात अभिष्टचिंतन सोहळा पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला .
यादिवशी सकाळपासुनच राजकीय, सामाजिक, आध्यत्मिक क्षेत्रातील दिग्गज हित चिंतकासह, मित्र परिवाराची त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला गर्दी लोटली होती. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या दरम्यान पाचोरा भडगाव मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी,भडगाव शहरातील जनता,स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे सदस्य तसेच मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त स्व. बापूजी युवा फाऊंडेशन तर्फे राबवलेले उपक्रम समाजातील प्रत्येक घटकाला भिडणारे ठरलेले आहेत. यात तरुणाईसाठी भव्य कबड्डी स्पर्धा क्रीडासक्तीला नवी ऊर्जा, मतिमंद शाळेतील मुलांसोबत स्नेहभोजन व गणवेश वाटप , आनंदाचे खरे क्षण मतीमंद शाळेला वॉशिंग मशीन भेट श्रम हलके करणारी देणगी. वारकरी संप्रदायातील मुलांसाठी स्नेहभोजन व गणवेश वाटप,श्रद्धेला आधार “वजन तोळा,वह्या वाटप”. विद्यार्थ्यांच्या भविष्याची अमुल्य भेट दिली.
तसेच अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर भडगाव शहरातील प्रत्येक गणेश मंडळातर्फे लकीचंद पाटील यांचा केक कापून वाढदिवस साजरी करण्यात आला यावेळी तरुणांची मोठी गर्दी होती






