जिल्ह्यात लंम्पी प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू; डॉ. झोड यांच्याकडून तीन तालुक्यांचा दौरा

जिल्ह्यात लंम्पी प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू; डॉ. झोड यांच्याकडून तीन तालुक्यांचा दौरा
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील एरंडोल, धरणगाव आणि पारोळा तालुक्यांमध्ये गायींमध्ये आढळून आलेल्या लंम्पी स्किन डिजीजच्या (Lumpy Skin Disease) किरकोळ प्रादुर्भावामुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून, उप आयुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी प्रत्यक्ष दौरा करून पाहणी केली.
डॉ. झोड यांनी सोमवारी तिन्ही तालुक्यांतील बाधित गावांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी स्थानिक पशुपालकांशी संवाद साधून रोगाचे स्वरूप, लक्षणे व प्रतिबंधक उपाय याबाबत मार्गदर्शन केले. यासोबतच त्यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना खालील उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले:
-
बाधित जनावरांचे त्वरित विलगीकरण
-
जनावरांच्या निवासस्थानी स्वच्छता आणि योग्य देखभाल
-
प्रतिबंधक औषधोपचार व लसीकरण
-
स्थानिक पशुवैद्यकीय यंत्रणेशी समन्वय
डॉ. झोड यांनी जनतेला घाबरून न जाता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. रोग नियंत्रणासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग सज्ज असून सर्व पशुपालकांनी सतर्क राहून खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या लंम्पीचा प्रादुर्भाव गंभीर नसला तरी प्रशासन कोणतीही ढिलाई न ठेवता रोग नियंत्रणासाठी नियोजनबद्ध पावले उचलत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.