जळगावः महापालिकेतील लाच प्रकरणातील रचना सहाय्यक मनोज वन्नेरे यास लाच स्वीकारतांना ९ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस विभागाला महापालिकेस अहवाल प्राप्त झाल्यावरून पोलीस कोठडीत स्थानबद्ध झाल्याच्या दिनांक ९ डिंसेबरपासून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आहे. पुढील आदेश होईपर्यंत हे निलंबन कायम असणार आहे. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच घेणाऱ्या महापालिकेतील नगर रचना विभागातील मनोज समाधान वन्नेरे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. आयुक्तांना आठ हजार तर नगररचनाकार यांना चार हजार द्यावे लागतात, त्यानंतर उरलेले मला घ्यावेलागते. असे संभाषणात रेकॉर्ड झाल्यानंतर पथकाने सापळा रचुन त्यावर कारवाई करण्यात आली होती.
तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण महानगरपालिके त मंजुरीसाठी टाकले होते. त्यांनी एकूण ३ प्रकरणे दाखल केलेले होते. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात २१ हजारांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये देण्याचे ठरले. तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले. असे एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रादार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. याबाबत आयुक्त व वन्नरे यांची एसीबीच्या पथकाने समोरा समोर चौकशी केली होती.