CrimeSocial

खुशखबर : आता जळगावच्या घरगुती नळजोडण्यामध्ये वॉटर मीटर बसणार

खुशखबर : आता जळगावच्या घरगुती नळजोडण्यामध्ये वॉटर मीटर बसणार

ऑक्टोबर पासून होणार प्रारंभ ;२४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न होईल साकार

जळगाव प्रतिनिधी

ऑक्टोबरपासून जळगावच्या घरगुती नळजोडण्यामध्ये वॉटर मीटर बसवण्याचे काम सुरू होणार आहे. जळगाव महानगरपालिकेने अमृत २.० योजनेअंतर्गत १८० कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला असून, त्याला शासनाची मंजुरी प्राप्त झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.

महापालिकेने योजनेसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे आणि ऑक्टोबरपासून वॉटर मीटर बसवण्याचे काम सुरू होणार आहे. यामध्ये शहरातील ९० हजार घरगुती नळजोडण्या समाविष्ट आहेत. यामुळे नागरिकांना त्यांच्या प्रत्यक्ष वापरलेल्या पाण्याचे शुल्क दिले जाईल

या प्रकल्पात बापुर धरणापासून फिल्टर प्लांटपर्यंत ८ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. याशिवाय, पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक वीजबिलात बचत करण्याच्या दृष्टीने सोलर प्लांट उभारला जाईल.

२४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न साकार होईल

वॉटर मीटर बसवण्यामुळे जळगाव शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा सुनिश्चित होईल. यामुळे पाण्याचा अपव्यय रोखला जाईल आणि प्रत्येक नागरिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळवता येईल. या योजनेमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होईल.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button