३४ वर्षांच्या सेवेनंतर शेख कामिल शेख नजीर सेवानिवृत्त

३४ वर्षांच्या सेवेनंतर शेख कामिल शेख नजीर सेवानिवृत्त
जळगाव – ( आसिफ शेख़) इक्रा एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण येथे ३४ वर्षांची ईमानेइतबारे सेवा करून शेख कामिल शेख नजीर सेवानिवृत्त झाले. त्यांनी १ ऑक्टोबर १९९१ रोजी पिऊन पदावर सेवा सुरू केली होती आणि ३१ मार्च २०२५ रोजी आपली सेवा पूर्ण केली.
शेख कामिल यांनी २० वर्षे पिऊन म्हणून तर पुढील १४ वर्षे लॅब अटेंडंट म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. त्यांनी इक्रा एज्युकेशन सोसायटी व एच. जे. थीम कॉलेजसाठी अत्यंत निष्ठेने सेवा बजावली.
त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या अशफाक पठाण यांनी सांगितले की, शेख कामिल यांनी नेहमीच साथ दिली आणि त्यांच्या सेवेत कधीही त्रुटी राहिलेली नाही. ते नेहमी वेळेआधी कामावर उपस्थित राहत असत.
सेवानिवृत्ती समारंभात डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या उपस्थितीत शेख कामिल यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सालार यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आरोग्य व आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात इक्रा एज्युकेशन सोसायटी व कॉलेजच्या सर्व सदस्यांनी शेख कामिल यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने झाली, जे प्रा. डॉ. अख्तर शाह यांनी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन मौलाना मुजम्मिल नदवी यांनी केले. प्रस्तावना डॉ. चांद खान यांनी मांडली.
या प्रसंगी डॉ. वकार शेख, डॉ. अंजली कुलकर्णी, अज़ीज शाह, अशफाक पठाण, एजाज मालिक, आमीनभाई बादलीवाला यांनी शेख कामिल यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार मांडले
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये प्रा. जफर शेख, अब्दुल रशीद दादा, अब्दुल अज़ीज सालार, तारिक शेख, डॉ. ताहेर शेख, डॉ. जबीउल्ला शाह, प्रा. पिंजारी, प्रा. देवकर, प्रा. डॉ. आयशा बासित, प्रा. डॉ. फिरदौस शेख, प्रा. डॉ. कहकशा, प्रा. डॉ. शबाना, प्रा. अमरीन, ग़जाला बाई, प्रा. डॉ. तनवीर खान, प्रा. डॉ. युसुफ पटेल, प्रा. डॉ. हाफिज शेख, प्रा. डॉ. मुस्ताकीम बागवान, प्रा. साजिद माळक, प्रा. डॉ. डापके, प्रा. डॉ. राजू गवारे, प्रा. उमर खान, अशरफ शाह, सय्यद शौकत अली, प्रभाकर गंगावे, रफिकभाई, आसिफभाई, वसीम शाहिद खटीक यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. इरफान शेख यांनी मानले.